उत्तरप्रदेश एटीएस ची मोठी कारवाई
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
11 July : उत्तर प्रदेश एटीएसने लखनऊमधील काकोरी भाग सील केला आहे. एटीएसला त्या भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाली होती. एटीएसनं दोन अतिरेक्यांना ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. परिसरात बाँम्ब स्कॉडदेखील दाखल झालं होतं. एटीएसला एका घरात कुकर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती. एटीएसकडून यासंदर्भात अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
एटीएसनं हा परिसर सील केला असून त्या परिसरात कोणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. परिसरातील कुटुबांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एटीएसकडून अधिक चौकशी सुरु आहे.एटीएसनं या भागातून काही स्फोटक पदार्थ जप्त केल्याची माहिती आहे. एटीएसनं या ठिकाणाहून दोन अतिरेक्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
त्यापैकी एक जण हा जुम्मूमधील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय आहे.उत्तर प्रदेश पोलिसांनी या मार्गावरुन जाणारी वाहतूक देखील थांबवली आहे. सर्च ऑपरेशन सुरु असेपर्यंत या भागातील वाहतूक बंद राहील, असं देखील कळवण्यात आलं आहे. लखनऊमध्ये काकोरी हा दाट लोकसंख्येचा भाग आहे. ही घटना समोर आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.