राजकारण

मंत्र्याचा दावा माझे पूर्वज हिंदू राजपूत होते

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 July : बिहार राज्यसरकार मधील मंत्री जमा खान यांनी दावा केला कि त्यांचे पूर्वज हे हिंदू राजपूत होते.बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान यांनी धर्मपरिवर्तनाच्या मुद्यावर आपलं मत स्पष्ट करताना आपले पूर्वज ‘हिंदू राजपूत’ असल्याचं म्हटलंय.अल्पसंख्यांक कल्याण मंत्री यांना पत्रकारांनी धर्मांतरणाच्या मुद्यावर सुरू असलेल्या चर्चेवर प्रश्न विचारले होते. त्याला उत्तर देताना खान यांनी स्वत:च्या कुटुंबाचंच उदाहरण दिलं.

जयराम सिंह आणि भगवान सिंह हे आमचे पूर्वज दोन भाऊ होते. ते बैसवाडातून आले होते आणि वैश्य ठाकूर होते. दोघं कैमूर भागात स्थायिक झाले. लढाई सुरू झाल्यानंतर भगवान सिंह यांनी मुस्लीम धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे भगवान सिंह यांच्या कुटुंबातील लोक मुस्लीम आहेत. परंतु, जयराम सिंह यांच्या वंशातील लोक आजही हिंदू असल्याचं त्यांनी सांगितलंय.आजही आपल्या कुटुंबातील अनेक लोक हिंदू राजपूत आहेत. पूर्वजांनी इस्लाम धर्म स्वीकार केला त्यामुळे आज आम्हीही मुस्लीम आहोत. परंतु, हिंदू नातेवाईकांशी आजही सलोख्याचे संबंध असल्याचं जमा खान यांनी म्हटलंय.