राजकारणबीडमहाराष्ट्र

पंकजाताई समर्थकांचे राज्यभरात राजीनामास्त्र

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 July : भागवत कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या तालमीत वाढलेले प्रस्थ त्याना मंत्री करून भाजपने एक तर वंजारी समाजसकट ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न साधला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील नारायण राणे सकट इतर तीन जणांची वर्णी लागली.राणे यांची तळकोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी वर्णी लावण्यात आल्याची शक्यता आहे तसेच कपिल पाटील हे आगरी समाजातून येतात आगरी समाज हा पालघर, ठाणे,मुंबई या पट्यात विभागला असून शिवसेनेला मुंबई महापालिकेत शह देण्यासाठी हा हुकमी एक्का पुढी करण्यात आल्याचा निर्वाळा होतो.भरती पवार ह्या नाशिक मध्ये भाजपाची पेठ बसवण्यासाठी मंत्रिमंडळात त्यांची एन्ट्री झाली असे समजते.

यामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. मात्र प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे दिसत आहे. पदाधिकारी एकापाठोपाठ एक राजीनामे देत आहेत. आतापर्यंत 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे. त्यामुळे बीडमध्ये भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.मंत्रिपद देण्यात न आल्यामुळे मुंडे भगिनी पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान शुक्रवारी पंकजा मुंडे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत पक्षाचा निर्णय मान्य आहे. मी नाराज नाही असे म्हटले होते, परंतु बीडमध्ये मुंडे समर्थकांमध्ये नाराजी आहे. याचा परीणाम म्हणून भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपवण्यात आला असला तरी या राजीनाम्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यांच्यासह अजून 14 जणांनीही राजीनामा दिल्याची माहिती आहे.पंकजा ताई पत्रकार परिषद घेऊन मानल्या होत्या मी पक्षावर नाराज नाही पण कार्यकर्तांना मला समजून घयावे लागेल.त्या म्हणाल्या पक्षाला वाटले असेल नवीन चेहऱ्याला संधी देऊन फायदा हो असेल ,तर पक्ष हा सर्वोच्च असतो व्यक्तिगत निर्णय होत नसतात असे त्या व्यक्त झाल्या.