रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रलच्या अध्यक्षपदी अजय घोडके यांची निवड
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
10 July (प्रतिक शामल कांबळे, बीड) :- माणूस हा केवळ एकमेकांच्या सहकार्याने प्रगती करतो. सजमाजसेवेसाठी कुठल्या डिग्रीची, पद्प्रतिष्ठेची किंवा कुणाच्या मार्गदर्शनाची गरज नसते. समाजसेवेचा भाव हा हृदयात असावा लागतो. जो संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी किंबहुना समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीसाठी वेळोवेळी नि: स्वार्थ भावनेने धावून येतो त्याचं नाव प्रत्येकाच्या ओठांवर यायला लागतं. अगदी याप्रमाणेच गेल्या सात वर्षांपासून समाजहीतासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची दर्जेदार उभारणी करणारा रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रलचा ग्रुप समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असतो हे बीडकरांनी या आगोदरही अनुभवलं आहे. रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रलच्या अध्यक्षपदी नव्याने अंकुर नैर्सगिक गूळ केंद्राचे संस्थापक तथा बीडमधील यशस्वी उद्योजक आणि नेतृत्व गुणांत पारंगत असणाऱ्या अजय घोडके यांची निवड झाली आहे तर सचिवपदी सुशील आंबड, उपाध्यक्ष गिरीश गिल्डा यांची निवड झाली आहे.
आजय घोडके यांच्या योगदानाने आजवर रोटरी सेंट्रलच्या ग्रुपने अनेक उपक्रम उभा केली आहेत. यापैकी एक सर्वात मोठा आणि समाजपयोगी उपक्रम म्हणजे बीड तालुक्यातील आहेर लिंबगाव येथील लेंढी नाल्याचे जवळपास पाच किलोमीटरपर्यंत लांबी रुंदीकरण, खोलीकरण केले. या उपक्रमामुळे या गावातील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न मिटला तर अनेक शेतकऱ्यांना देखील या उपक्रमामुळे मोठा फायदा झाला.
कलाविष्कार जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा, बीड प्रज्ञाशोध परीक्षा जी 20 हजार विद्यार्थी एकाच दिवशी एकाच वेळी देतात, दरवर्षी वृक्षारोपण, दरवर्षी आदिवासी, अनाथ मुलं, वृद्धाश्रम यांना भेट व त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे तर त्यांना दिवाळीचा फराळ वाटप करणे, लॉकडाऊन काळात 50 दिवस रोज दोनशे लोकांना जेवणाचे टिफिन घरपोहोच वाटप,
कोल्हापूर सांगली येथे महापूर आला असता दोन दिवस तिथेच थांबून त्या लोकांचे जेवणाची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था आरोग्य तपासणी व औषधी गोळ्यांचे मोफत वाटप सर्व क्लब मधील डॉक्टर व सदस्य यांनी केले तर गोरगरिबांचा रोजगार चालावा ही अपेक्षा ठेवून दरवर्षी शिलाई मशीनचे वाटप. अशी अनेक कौतुकास्पद उपक्रम रोटरी सेंट्रलच्या माध्यमातून उभी राहिली आहेत.
आजय घोडके यांनी रोटरी क्लबमध्ये या अगोदर सचिव म्हणून काम पाहिलेले आहे तर डिस्ट्रिक्ट ऑफिसर म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. नेतृत्व गुणांत पारंगत असणाऱ्या अजय घोडके यांच्या खांद्यावर रोटरी सेंट्रल ग्रुपच्या अध्यक्षपदाची जिम्मेदारी आल्याने येणाऱ्या काळात आणखी नवनवीन समाजपयोगी उपक्रम बीड शहरात उभा राहणार यात शंका नाही असा विश्वास संस्थापक अध्यक्ष संदेश लोळगे, सुकेश राव, ज्ञानेश्वर तांबे आणि रोटरी सेंट्रलच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केला आहे. सविस्तर वृत्त उद्याच्या दै. झुंजार नेता अंकात…!