बीड कोरोना रिपोर्ट; रुग्णसंख्येचा पुन्हा वाढला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
11 July :- बीड जिल्ह्यात हळूहळू पुन्हा एकदा कोरोना विषाणूने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात शुक्रवारी ४०८५ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज १० जुलै प्राप्त झाले, त्यामध्ये १८८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३८९७ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
बाधितांमध्ये बीड तालुक्यात ३०, अंबाजोगाई ६, आष्टी ८१, धारूर ६, गेवराई २१, केज १५, माजलगाव २, पाटोदा १७, शिरूर ७, वडवणी ५ असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोरोनाचा आकडा गत चार दिवसांत १०० वरून २०० च्या घरात गेला आहे, त्यामुळे वेळीच कोरोना नियमांचे पालन करून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.