News

बीड जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णावर पहिले डायलिसिस

किल्लेधारूर दि.२९(प्रतिनिधी) येथील कोरोना बाधित रुग्णाचे डायलिसिस जिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून डायलिसिस नंतर रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याची प्रतिक्रिया कुटूंबियांनी दिली.

डायलिसिस वर असलेल्या कोरोना बाधित रुग्णाला त्रास होत असल्याची तक्रार करत कुटूंबियांनी तात्काळ डायलिसिस करण्याची मागणी केली होती. जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाग्रस्त रुग्णाची पहिली डायलिसिस पुर्ण केली. डॉ. मनोज मुंडे यांच्या देखरेखीखाली, डायलिसिस तज्ञ किशोर दुनघव, परिचारीका स्वाती गव्हाणे, बलभिम माने यांनी यशस्वीरित्या हे डायलिसिस केले. कुटूंबियांनी जिल्हा आरोग्य विभागाचे आभार मानले आहे.