राजकारणमहाराष्ट्र

पंकजाताई मुंडेची राजकीय परिपक्वता पुन्हा दिसली

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 July : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला त्यात महाराष्ट्रातील नारायण राणे,भरती पवार,भागवत कराड,आणि कपिल पाटील या धुरिणींनी शपथ घेतली.शेवट पर्यंत बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद भेटणार याची चर्चा देखील रंगली पण ऐनवेळी औरंगाबाद चे महापौर राहिलेले एकेकाळचे गोपीनाथ मुंडे यांचे शिष्य भागवत कराड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली.पक्षाने प्रीतम ताईनं मंत्रिपद न दिल्याने ओबीसी समाजासकट वंजारी समाजात नाराजी पसरली त्याचीच परिचिती आज विविध पधाधिकाऱ्याच्या राजीनामास्त्रात झाले.

प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ओबीसी नेत्यांनी भाजपवर टीका केली. तर शिवसेनेने देखील भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून पंकजा मुंडेंना राजकीय जीवनातून संपवण्याचं काम सुरु असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. मात्र, स्वत: पंकजा यांनी सावध पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त न करता नेतृत्वाच्या निर्णयाचं त्यांनी स्वागतही केलं. यातच त्यांची परिपक्वता दिसून येते पक्ष हा व्यक्तिकेंद्री नसून पक्ष सर्वांसाठी असे मत त्यांनी व्यक्त केले.