जागतिक आरोग्य संघटनेचा कोरोनाच्या कप्पा व्हेरियंट बद्दल इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
9 July : कोरोनाची दुसऱ्या लाटेत डेल्टा नावाच्या व्हेरियंट ने मोठी हानी केली त्यात अनेकांचे जीव ऑक्सिजन गमवावे लागले.कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस, लॅम्बडा व्हेरियंट नंतर कप्पा नावाचा व्हेरियंट उत्तरप्रदेशात सापडला आहे.देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाचा करोनाचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. हा विषाणू म्युटेट होत असून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा प्रसार होऊ लागला आहे. आत्तापर्यंत करोनाच्या अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लस अशा प्रकारांची चर्चा असताना आता करोनाच्या कप्पा विषाणू चे चे रुग्ण सापडू लागले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये करोनाच्या कप्पा व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचे उपाय योजले जात आहेत. मात्र, हा फक्त करोनाचा एक प्रकार असून त्यावर उपचार शक्य आहेत, त्यामुळे चिंतेचं कारण नाही, असं उत्तर प्रदेश प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.उत्तरप्रदेशात कप्पा विषाणूचे दोन रुग्ण सापडले मुळे भीतीचे वातावरण तयार झाले असून प्रश्नाकडून हा विषाणू धोकादायक नसल्याचा निर्वाळा देण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये कप्पा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळून आला होता. या व्हेरिएंटला B.1.617.1 तर डेल्टा व्हेरिएंटला B.1.617.2 असे कोड देण्यात आले आहेत. मात्र, कप्पा व्हेरिएंटची रुग्णसंख्या आणि प्रसार पाहाता अजूनपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेनं हा विषाणू चिंतेचं कारण ठरला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.