16% फी माफीचं ‘गाजर’ दाखवणाऱ्या ‘सेंट अँन्स स्कूलसमोर’ संतप्त पालकांचा ठिय्या!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
8 July :- फीस न भरलेल्या मुलांना नवं शैक्षणिक वर्षाची पुस्तके देण्यास नकार देणाऱ्या सेंट अँन्स स्कूलमध्ये संतप्त पालकांनी आज ठिय्या मांडला. गत वर्षाची शाळा फी १००% माफ करावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी सेंट अँन्स स्कूलमधील समस्त पालकांनी शाळेच्या आवारात एकत्रित येऊन केली होती. शाळा व्यवस्थापनाने वरिष्ठांशी बोलून येत्या काही दिवसात निर्णय सांगू असं आश्वासनही दिल होतं. यानंतर बीड जिल्हा परिषद सीईओ अजित कुंभार यांनी बीड शहरातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पत्रक काढून ५०% फी माफ करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र शाळा व्यवस्थापनाने जिल्हा परिषद सीईओ अजित कुंभार यांच्या पत्रकाचा आणि आमचा काही संबंध नसल्याचं सांगत पालकांना केवळ १६ % शाळा फी माफ होऊ शकते यापुढे नाही. असे सांगितले तर फीस न भरलेल्या मुलांना नवं शैक्षणिक वर्षाची पुस्तके देण्यासही नकार दिला.
शाळा व्यवस्थापनाने केवळ १६ % फीस माफीचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. शाळेने निदान ५० % तरी फी माफ करावी अशी मागणी पालक वर्गातून होतं आहे. या कारणांमुळे आज सकाळच्या सुमारास संतप्त पालकांनी शाळेच्या आवारात एकत्रित येऊन शाळा व्यवस्थापनासमोर ठिय्या मांडला. आमच्याकडं लाखो रुपये आहेत. परंतु आम्ही फुकट फीस का भरावी? असा सवाल पालकांनी शाळा व्यवस्थपनासमोर उपस्थित केला. सविस्तर वृत्त उद्याच्या (९/जुलै/२०२१) अंकात प्रकाशित होईल…