पंकजाताईंचे कार्यकर्त्यांना भावनिक आहवान
बीड | भाजप नेते आणि दिवंगत केंद्रिय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून रोजी स्मृतीदिन असतो. या निमित्ताने त्यांचे समर्थक गोपीनाथगडावर जमत असतात. परंतू यावेळी या स्मृतीदिनावर कोरोनाचं संकट असल्याने पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत गडावर जमू नका, असं सांगितलंय. तर साहेबांच्या स्मृतीदिनाला समाजकार्य करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्याला दिला आहे.
3 जूनचा दिवस संघर्ष दिन म्हणून आपण साजरा करतो. गोपीनाथ गड माणसांनी तुडुंब भरलेला असता. पण यावेळी संघर्ष वेगळा आहे. सर्वांनी करोनामुळे काळजी आणि लॉकडाउनच्या नियमांचं पालन करायचं आहे, ही माझी विनंती आहे. यावर्षी कोणीही गर्दी करायची नाही. दर्शनासाठी नाही आणि मला भेटण्यासाठी देखील नाही.
3 जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांचा फोटो समोर उभे रहा. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा.