महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या कोरोनाबाबत आल्या महत्वपूर्ण सूचना

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 July : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली व करोना स्थितीचा आढावा घेतला. ‘प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या उद्योगपतींची बैठक घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरू ठेवण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन करावं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ‘ज्या उद्योजकांना कामगारांच्या राहण्याची व्यवस्था कंपनीच्या आवारात करणं शक्य आहे, त्यांनी वेळीच तसं नियोजन करावं व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथं राहण्याची व्यवस्था करावी.

त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांना आवश्यक ते सहकार्य करावं,’ अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याकरोनाची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नाही. मात्र, याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे काही आर्थिक उपक्रम सुरू करत आहोत. हे करताना कुठलेही निर्बंध कागदावर राहणार नाहीत, ते काटेकोरपणे अमलात येतील, कुठेही गर्दी होणार नाही, सभा समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.आता पावसाळा आहे, या काळात साथीचे इतर आजार उद्भवतात. त्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. याच काळात आपले सणउत्सव सुरू होतात. ही सगळी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय ऑक्सिजनच्या तयारीचाही आढावा घेतला. त्यांनी ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा आणि रुग्णसंख्या वाढल्यास करावयाची पूर्वतयारी या सर्वच प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गावागावांत जनजागृती करून करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले सर्वजण दुसरा डोस वेळेत घेतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.

लसीचे दोन्ही डोस घेऊन करोना बाधित होणाऱ्यांची संख्या, त्यांची स्थिती आणि कारणे याचे टास्क फोर्सने विश्लेषण करावे, ही माहिती संकलित करताना ती अनुभवजन्य राहील याची काळजी घ्यावी, असंही मुख्यमंत्र्यांनी मुंबई: करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सज्ज झालं आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा राज्यातील अर्थचक्रावर कोणताही परिणाम होऊ नये या दृष्टीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.