‘या’ देशाच्या राष्ट्रपतींचा गोळीबारात मृत्यू
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
7 july : कॅरिबियन देश हैतीचे अध्यक्ष जोवेनेल मोईस यांची हत्या करण्यात आली आहे. अंतरिम पंतप्रधानांनी ही माहिती दिली. अंतरिम पंतप्रधान क्लेड जोसेफ यांनी म्हटले आहे की बुधवारी सकाळी हा प्राणघातक हल्ला झाला. राष्ट्रपतींची हत्या त्यांच्या खासगी निवासस्थानी करण्यात आली. फर्स्ट लेडी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत .
काही अज्ञात लोकांनी राष्ट्राध्यक्षांच्या खासगी निवासस्थानी त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. यातील काही लोक स्पॅनिश बोलत होते. जोसेफ यांनी सांगितले की, देशाच्या फर्स्ट लेडीलाही गोळ्या घालण्यात आल्या, परंतु या हल्ल्यात त्या बचावल्या.हैतीमधील विरोधी पक्षाने म्हटले की, मोईस यांचा पाच वर्षांचा कार्यकाल या वर्षी संपुष्टात यायला हवा होता, परंतु मोईस म्हणाले होते की ते आणखी एक वर्ष पदावर राहतील.
म्यानमारनंतर फेब्रुवारी महिन्यात हैतीमध्ये तख्तपालट करण्याचा कट रचला होता. त्यावेळीही मोईस यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्यांनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली होती. मोईस म्हणाले होते की, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला गोता, त्यावेळी त्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी हा डाव उलटून लावला होता.