राजकारण

महाराष्ट्राच्या ‘या’ दिग्गजांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 July : मोदी सरकारचा दुसऱ्या पारित पहिला कॅबिनेट विस्तार आज पार पडला त्यात तब्बल ४३ कॅबिनेट तसेच राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.महाराष्ट्र्रातील भाजप नेते व शिवसेनेला सतत टीका करणारे दिग्गज नारायण राणेंनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. आणखी राज्यातील राणे व्यतिरिक्त ३ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

भारती पवार ,कपिल पाटील,भागवत कराड आणि राणे अशी महाराष्ट्रातील शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावे आहेत.केंद्रातील विद्यमान मंत्र्यांपैकी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांनी देखील राजीनामे दिले आहेत. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत असून त्यात १५ कॅबिनेट आणि २८ रायमंत्रीच शपथ शपथविधी होणार आहे.