हवामान विभागाचा मान्सूनबाबत महत्वपूर्ण इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
7 July : शेतकऱ्यासांठी मोठी दिलासादायक बातमी हवामान विभागाकडून आली आहे.मान्सून चे दमदार आगमन पुढच्या आठवड्यात होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.पाऊसाचे आगमन ८ ते ९ जुलै दरम्यान राज्यभरात पुन्हा होणार असून राज्यात मान्सूनचे आगमन होताच मुसळधार हजेरी लावलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांत मात्र दडी मारली आहे.
मान्सूनची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी पेरणीलाही सुरुवात केली. पण पाऊसच गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कोसळलं. अशात आता पुन्हा पाऊस सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ८ ते ९ जुलैनंतर राज्यभर पावसाचं पुन्हा कमबॅक होईल.
रायगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्श, कोकणात पाऊस दमदार हजेरी लावेल. आजच्या हवामानाबद्दल दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या काही तासांमध्ये ठाण्यासह काही उपनगरांमध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसतील. तर मुंबई, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे.पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उद्या पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यातही कोकण विभागात फारसा पाऊस नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो. त्यानंतर ८ जुलैला विदर्भामध्ये तसेच लगतच्या मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मात्र, याचे प्रमाण ९ ते १५ जुलैच्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात सर्वदूर पाऊस असू शकेल. तसेच कोकणातही पुन्हा पावसाचा वेग वाढेल असा, अंदाज आहे.