Recent News

आता ‘या’ सात जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 july : आसाम राज्यात कोरोनाचा जोर वाढत असल्याचा दिसल्यामुळे राज्यसरकारने सात जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन चं निर्णय घेण्यात आला आहे.आसाम मधील पुढील जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असणार आहे. गोलपारा, गोलाघाट, जोरहाट, लखीमपूर, सोनितपूर, विश्वनाथ आणि मोरीगाव या सात जिल्ह्यांत संपूर्ण टाळेबंदी घोषित करण्यात आलीय. उद्यापासून संपूर्ण लॉकडाऊन लागू होईल. हा लॉकडाऊन पुढच्या आदेशापर्यंत कायम राहील.आसाममध्ये सोमवारी २६४० नवीन करोना संक्रमित रुग्ण समोर आली.

यासोबतच राज्यातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ५ लाख १९ हाजर ८३४ वर पोहचली. तर काल २४ तासांत ३१ मृत्यू नोंदविण्यात आल्यानंतर एकूण मृतांची संख्या ४६८३ वर पोहचलीय.यात गोलाघाट जिल्ह्यात सर्वाधिक ३३३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सोनितपूर (२३३ रुग्ण), कामरुप मेट्रोपॉलिटन (१९७ रुग्ण) आणि जोरहाट (१५१ रुग्ण) यांचा क्रमांक लागतो.सोमवारी राज्यात १ लाख १६ हजार ५४२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील २६४० लोक संक्रमित आढळून आले. राज्यात सध्या २२ हजार २४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आतापर्यंत राज्यात ४ लाख ९१ हजार ५६१ रुग्णांनी करोनावर मात केलीय. तर ७६.८५ लाखांहून अधिक जणांना कोविड १९ विषाणूविरुद्ध लस देण्यात आलीय. यातील १३.०९ लाख जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.