राजकारण

काँग्रेसच्या बड्या नेत्याचा उद्या भाजप प्रवेश

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 July : बुडत्याला तिनाक्याचा आधार अशी गत काँग्रेस ची झाली असा होरा काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्याची रांग सांगून जाते. एकामागून एक काँग्रेसी काँग्रेस सोडत असून भाजपचे जणू सुवर्णयुग चं अवतरलं असं दिसू लागलं आहे. अशातच काँग्रेस चे बडे प्रस्थ आणि माजी मंत्री, काँग्रेसचे कृपाशंकर सिंह यांचा उद्या भाजप प्रवेश करणार आहेत . मुंबईत उद्या चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश दुपारी मुंबई प्रदेश कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम अधिकृत होणार आहे. कृपाशंकर सिंग माजी काँग्रेस नेते आणि मंत्री आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कृपाशंकर एसीबीच्या रडारवर होते. उत्तर भारतीयांमध्ये कृपाशंकर यांचं मोठं प्रस्थ होते. मुंबई पालिकेच्या तोंडावर कृपाशंकर यांच्या प्रवेशामुळे भाजपला फायदा झाला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह यांच्या रूपाने उत्तर भारतीयांचा मुंबईतील एक प्रमुख नेता भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने बरीच गणितं बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सिंह हे गृहराज्यमंत्री होते. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलेलं आहे. २०१९ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर गेले २० महिने कृपाशंकर हे सक्रिय राजकारणात नव्हते. या दरम्यान त्यांची भाजपशी मात्र जवळीक वाढली होती. त्यातूनच भाजपने मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवत कृपाशंकर यांच्यासाठी पक्षाचे दार खुले केल्याचे बोलले जात आहे.