राजकारण

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी ८ राज्याचे राज्यपाल बदलले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 July : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म चा पहिला कॅबिनेट विस्तार ८ जुलै होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.अशातच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ८ राज्याच्या राज्यपालाच्या नियुक्त्या केल्या.२०१८ मध्ये देखील ७ राज्यपालाच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. केद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांना केंद्रीय मंत्री पदावरुन काढून कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी जोतिरादित्य सिंधिया यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, त्यांना कोणते खाते मिळले याबाबत अजून कोणतेही अधिकृत माहिती मिळाली नाही.

मोदी सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहे. या मंत्रिमंडळात मध्यप्रदेशातून जोतिरादित्य सिंधिया, आसाममधून सर्बानंद सोनोवाल आणि बिहारमधून माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक असल्याने उत्तर प्रदेशला झुकते माप मिळण्याची शक्यता असून वरुण गांधी, रामशंकर कठेरिया, अनुप्रिया पटेल यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे सांगितले जात आहे.

मंगूभाई छगनभाई पटेल यांना मध्यप्रदेशचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारतील, थावरचंद गेहलोत केंद्रीय मंत्री होते, आता कर्नाटकचे राज्यपाल होतील.रमेश बॅस त्रिपुराचे राज्यपाल होते, आता झारखंडचे राज्यपाल होतील. बंडारू दत्तात्रेय हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते, आता हरियाणाचे राज्यपाल होतील. सत्यदेव नारायण आर्य हरियाणाचे होते, आता त्रिपुराचे राज्यपाल होतील.. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होतील.पीएएस श्रीधरन पिल्लई मिझोरमचे राज्यपाल होते, आता गोव्याचे होतील.आणि हरिबाबू कंभंपती मिझोरमचे राज्यपाल होणार आहेत.