क्राईम

अट्टल दरोडेखोर धारदार हत्यारा सकट जेरबंद

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 July : पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. या पथकाने लोणीकंद परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक केले. पोलिसांनी या टोळीकडून गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी असा १ लाख १५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी दत्ता गायकवाड (वय २३ ), गौरव परजणे (वय २० ), किशोर जाधव (वय २२ ), दत्ता व्यवहारे (वय ३७ , सर्व रा. वाघोली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांचा साथीदार अजय माकर (वय २५ ) फरार झाला आहे. यामधील दत्ता व्यवहारे हा मनसेच्या सहकार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई ऋषिकेश व्यवहारे व पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे यांना एक गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार लोणीकंद ते बकोरी रस्त्यावर खंडोबाचा माळ परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याचे पोलिसांना समजले.

त्यानुसार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चार जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून गावठी कट्टा, सुरी, मिरचीपूड असा दरोडा टाकण्यासाठी लागणारा ऐवज जप्त केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.