केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात ‘हे’ नावं चर्चित
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
5 July : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून यात महाराष्ट्रातील महत्वाची महिला खासदाराची नवे चर्चित आहेत.पूनम महाजन तसेच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची देखील केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.नारायण राणे आणि हिना गावित यांची नावे देखील चर्चिली जात आहेत. ७ जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून १७ ते २२ मंत्री शपत घेऊ शकतात .
पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकामागून एक बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळात 81 सदस्य असतील. सध्या 53 मंत्री आहे, म्हणजे 28 मंत्री सहभागी होणार आहे.मोदी सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण केली आहे. पहिला विस्तार सर्वसमावेशक होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या मंत्रिमंडळातील बऱ्याच जणांना संघटनाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहर्यांचा समावेश असू शकतो. मंत्रिमंडळात प्रादेशिक पक्षांना समाविष्ट करण्याचीही तयारी आहे. उत्तर प्रदेश तीन ते चार मंत्री सहभागी होण्याची शक्यता ज्यात अपना दलच्या अनुप्रिया पटेल,बिहार दोन ते तीन मंत्री सहभागी होण्याची शक्यता ज्यात भाजप- सुशील मोदी,जेडीयूचे सिंह,एलजेपीचे पशुपती पारस,मध्यप्रदेश एक किंवा दोन मंत्रीसहभागी होण्याची शक्यता ज्यात ज्योतिरादित्य सिंधियारा,केश सिंह,राजस्थान एक मंत्री सहभागी होण्याची शक्यता ,जम्मू-कश्मीर एक मंत्री सहभागी होण्याची शक्यता,लडाख एक मंत्री सहभागी होण्याची शक्यता ,आसाम एक किंवा दोन मंत्री सहभाग होण्याची सोनोवाल यांच्या नावाची चर्चा,पश्चिम बंगाल,शंतनू ठाकूर,निशीथ प्रामाणिक,ओडिसा एक मंत्री मंत्री सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.