महाराष्ट्रराजकारण

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 July : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले.सभागृहात आज अधिवेशन चालू झाले असता काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांचा माइक ओढून घेण्याचा प्रयत्न केला तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन झाले.भाजचे आमदार हरिष पिंपळे यांचंदेखील नाव आहे.

हरिष पिंपळेअकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील विधानसभा मतदार संघातून निवडणून आलेले आहेत.हरीश पिंपळे हे सलग तीन वेळेस मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आहेत. हरिश पिंपळे यांची निलंबनाची ही दुसरी वेळ आहे. विदर्भातील आमदार अधिवेशनात काहीच बोलत नाहीत. पण त्याला पिंपळे हे अपवाद आहेत. पिंपळे जेव्हा पहिल्यांदा आमदार निवडून आले होते तेव्हाही अधिवेशनात राडा घातल्याने त्यांना 3 दिवसांसाठी निलंबित केले होते. आज त्यांना पुन्हा 1 वर्षासाठी निलंबित केले आहे.

पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.निलंबनाची कार्यवाही साठी प्रस्ताव अनिल परब यांनी मांडला तसेच भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली.अनिल परब यांचा निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील आमदार संख्या कमी करण्यासाठी हे निलंबन करण्यात आल्याचे अशी टीका त्यांनी केली.