राजकारण

ओवैसीं चे योगी आदित्यनाथ यांना चॅलेंज

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 July : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली याचे प्रत्यंतर आरोप प्रत्यारोप एकमेकांवर फैरी झडू लागल्या आहेत.ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे अध्यक्ष ओवैसी यांनी उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चॅलेंज दिले कि त्यांना परत मुख्यमंत्री होऊ देणार नाही. २०२२ मध्ये आणखी सर्वात मोठ्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच्या तयारीला भाजपासह काही पक्ष लागल्याचं दिसतंय. उत्तरप्रदेश असदुद्दीन ओवैसींनी विधानसभेसाठी हिंदू-मुस्लिम मतांचं ध्रूवीकरण करण्याचा प्रयत्न आतापासून झालेला दिसतोय.

ओवैसीनी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आव्हान दिलंय .योगी आदित्यनाथ यांना कुठल्याच स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री होऊ देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञाच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केलीय. योगी आदित्यनाथ यांनीही, ओवैसी हे मोठे नेते असून त्यांचं आव्हान स्वीकारत असल्याचं म्हणाले. योगी आदित्यनाथ म्हणाले की, यूपीत यावेळेसही भाजपचंच सरकार बनणार आणि त्यांना कुणी आव्हान देऊ शकत नाही.

औवेसी हे मोठे नेते आहेत, पण यूपीत भाजपा मुल्य आणि मुद्यांच्या आधारावर निवडणूक लढवते. असंअसतानाही जर ओवैसी आव्हान देणार असतील तर ते स्वीकारतो असही आदित्यनाथ म्हणाले.बिहार विधानसभेला ओवैसींच्या पार्टीला चांगला यश मिळालं. बंगालमध्ये ते फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.

यूपीत मुस्लिमांच्या संख्या पहाता, मोठ्या यशाची एमआयएमला अपेक्षा आहे. त्यामुळे एमआयएम नं छोट्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय. तसच औवेसींनी १०० जागा लढवणार असल्याची घोषणा केलीय. तसच ओमप्रकाश राजभर यांच्या नेतृत्वात सुहेलदेव भारतीय समाज पार्टीसारख्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचं ठरवलंय. ओवैसींनी उत्तर प्रदेश विधानसभेसाठी आम्ही १०० जागांवर उमेदवारउभे करणार असे त्यांनी ट्विट सांगितले.