छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन
रायपूर: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. १५ दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शनिवारी होणार अंत्यसंस्कार
अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांनी ट्विटरवर अजित जोगी याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. अजित जोगी याच्या पार्थिवावर उद्या शनिवारी त्याचे जन्म ठिकाण गोरैला येते अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती, अमित जोगी यांनी दिली आहे.
९ मे रोजी रुग्णालयात केले गेले दाखल
९ मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अजित जोगी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९ मे या दिवशी सकाळी न्याहरी करताना अचानक जोगी यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांच्या पत्नी रेणु जोगी त्यांचया जवळच होत्या. त्यांनी घरातील कर्मचाऱ्यांना तातडीने याची माहिती दिली . त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आपल्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे समजल्यानंतर त्यांचे पुत्र अमित जोगी तातडीने बिलासपूरला पोहोचले होते.