महाराष्ट्र

बोगस लसीकरण करून लुटले 4 लाख 23 हजार रूपये

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 July :- मुंबईनंतर आता नवी मुंबईतही बोगस लसीकरण झाले असल्याची घटना समोर आली असून मुंबई आणि नवी मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणाच्या दोन्ही घटनेतील आरोपी एकच आहेत. तुर्भे एमआयडीसी मध्ये असलेल्या ॲटोंबर टेक्नॉलॉजी कंपनीत एप्रिल महिन्यात 352 कामगारांचे लसीकरण करण्यात आले होते. मुख्य आरोपी डॉ मनीष त्रिपाठी याने केसीईपी हेल्थ केअरच्या नावाने कॅम्प घेत कंपनीतील सर्व कामगारांचे लसीकरण केले होते. यासाठी त्यांनी कंपनीकडून 4 लाख 24 हजार रूपये बिल आकारले.

लसीकरणानंतर आरोपीने अनेक दिवस सर्टीफिकेट न दिल्याने कंपनी व्यवस्थापणाने याबाबत तगादा लावला होता. अखेर दोन कामगारांचे सर्टीफिकेट देत त्यावर लिलावती हॉस्पिटलचा उल्लेख असल्याने ॲंटोबर टेक्नोलॉजी कंपनी व्यवस्थापनाला यात काळेबेरे असल्याचा संशय आला. यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करून तपास केला असता कामगारांचे केलेले लसीकरण बोगस असल्याचे तपासात समोर आले. आरोपी डाॅ मनीष त्रिपाठी, करीम आणि अन्य एक साथीदार या तिघांवर विविध कलमांव्दारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन आरोपी मुंबई पोलिसांच्या कस्टडीमध्ये असून यातील तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.