क्राईम

खळबळजनक! दोन इसमाचे मृतदेह आढळले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 July : खळबळजनक अशी घटना समोर आली असून सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मांजर्डे गावाच्या हद्दीत हातनूर रोडला दोघांचे मृतदेह सापडले. एकमेकांपासून 50 फूट अंतरावर मृतदेह आढळले आहेत.सांगलीत एकाच वेळी दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. एकमेकांपासून 50 फूट अंतरावर दोन पुरुषांचे मृतदेह सापडले.

दोघांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असलं तरी हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.दोघा मृतदेहांची ओळख पटली असून एकाचे नाव तानाजी शिवराम शिंदे (वय 65 राहणार आरवडे) तर दुसऱ्याचे नाव अजित बाबुराव साळूखे (वय 50 राहणार माजर्डे) आहे. दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.