बीडक्राईम

हृदयद्रावक! झोपेतच चिरला गळा बीड थरारल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 July : बीडमधील एका 21 वर्षीय तरुणाचा झोपेतच गळा कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा हल्ला कोणी केला हे अजुन समजले नाही . या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. नारायण गाडेकर असं जखमी झालेल्या युवकाचं नाव असून ही घटना दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाबळगाव येथे घडली आहे.

माहितीनुसार बीड जिल्ह्यातील बाबूळगाव गावावमध्ये नारायण गाडेकर हा 21 वर्षीय तरुण 2 जून रोजी रात्री गाढ झोपेत होता. यावेळी त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने अचानकपणे हल्ला केला. तसेच या हल्यामध्ये गाडेकर तरुणाचा अज्ञाताने गळा कापला. गळा कापल्यामुळे या हल्ल्यात नारायण गाडेकर हा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकारमुळे बाबळगाव तसेच पंचक्रोशीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

गळा नेमका कोणी कापला ? नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर नारायण गाडेकर या तरुणाला औरंगाबादमध्ये रुग्णालयात हलवण्यात आले त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गळा कापल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. सध्या या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.