पुन्हा कडक लॉकडाऊन; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
3 July :- वारंवार आवाहन करूनही कोरोना विषयक निआयामांची पायमल्ली झाल्याने आटोक्यात येणारा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा अचानक वाढू लागतो याला जबादार कोण? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने शोधन गरजेचं आहे. प्रत्येकवेळी लॉकडाऊन कारण शक्य नाही. परंतु प्रशासनाला कोरोनाचे वाढते संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी मजबुरीपोटी लॉकडाऊनचा कठोर निर्णय घ्यावा लागतो.
कोरोनाचा पॉजिटिव्हिटी रेट वाढल्याने सातारा जिल्हात आजपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून अत्यावश्यक सेवाही सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेतच सुरु राहणार आहेत. तर शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन केला जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे शनिवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
जिल्ह्यात सध्या शनिवार आणि रविवार वगळता वेळेच्या मर्यादेत दुकानं सुरु होती. परंतु, जिल्ह्यातील कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी साताऱ्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा लॉकडाऊन पुढील आदेशापर्यंत सुरु राहील, असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सातारकरांनी आता घरातच राहून प्रशासनाच्या आदेशाचं पालन करावं असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.