बीडमहाराष्ट्रराजकारण

‘हा’नेता राज्यभर मराठा आरक्षण आंदोलन छेडणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 July : शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी पुन्हा मराठा आरक्षण प्रश्नी राग आवळला असून राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.२६ जुलै रोजी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे त्याची सुरुवात कोल्हापूर येथून करणार असे आमदार मेटे सांगितले.शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराज यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले पण सद्याच्या सरकारला हे आरक्षण देता आले नाही.मेटे म्हणाले, राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही. केवळ दोन दिवसाचे अधिवेशन हे तकलादू आहे. फक्त मराठा आरक्षण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तीन दिवसाचे अधिवेशन घेणे आवश्यक आहे.

हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन पंतप्रधानांची भेट घेणे आवश्यक आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.मराठा आरक्षणा संदर्भात या पवित्र स्थळांवर अनेक नेत्यांची भाषणे होतात. अनेक जण या आंदोलनस्थळी येऊन भाषण ठोकून गेले. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून कोणीच यशस्वी होत नाही. या व्यासपीठांवरून केवळ समाजाची दिशाभूल केली जाते, असे मत मेटे यांनी व्यक्त केले.राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तयार केलेली सुकाणू समिती ही शिवप्रेमींच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी केली आहे. या समितीमध्ये कोणीही इतिहास तज्ज्ञ, दुर्गप्रेमी यांचा समावेश नाही. केवळ निमंत्रित सदस्य म्हणून छत्रपती संभाजी राजे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे, असा आरोप मेटे यांनी राज्य सरकारवर केला .