राजकारण

राज्यात पुन्हा सत्ता पालट बाबतीत चर्चा रंगली

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 July : राज्यात आता सत्ता बदलाची चर्चा जोर धरू लागली.सविस्तर असे कि राज्याचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली अन ऑपरेशन लोटस म्हणजे सत्तांतराचा चर्चा होऊ लागली.आज फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी ही भेट झाली असली तरी त्याची माहिती आता समोर आलीय. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ दोन तास बैठक सुरु होती. मात्र या बैठकीत नक्की कोणत्या विषयांवर चर्चा झाली यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही.

तरी या बैठकीमुळे भाजपाच्या मिशन कमलची तसेच फडणवीसांना पंतप्रधान मोदींच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये संधी मिळण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा रंगू लागल्यात.अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि फडणवीस यांच्यामध्ये फोनवरुन २० मिनिटं चर्चा झाली. दिल्लीतील या चर्चेनंतर फडणवीस तातडीने महाराष्ट्रात परतले होते. त्यानंतर महाराष्ट्रामधील भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपाचे मोजके महत्वाचे नेते उपस्थित होते अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतर अनेक नवीन विषय राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आले असून यामागे ऑप्रेशन लोटससंदर्भातील शक्यताही काही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.