बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्र्यांचीं मोठी घोषणा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
2 July : बारावीच्या विध्यार्थ्यांना गुण देण्यासाठीचा फॉर्मुला आता शिक्षण मंडळाने जाहीर केला.केंद्रीय शिक्षण बोर्ड सीबीएसई ने जो फॉर्मुला अवलंबला तोच फॉर्मुला ३०-३०-४० याचा प्रमाणे मूल्यमापन करण्यात येणार आहे.शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मूल्यमापन कार्यपद्धत जाहीर करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.यानुसार इयत्ता दहावीच्या गुणांचे ३० टक्के वेटेज, इयत्ता अकरावीच्या गुणांचे ३० टक्के वेटेज आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ४० टक्के वेटेज यावरुन बारावीचा अंतिम निकाल दिला जाणार आहे. या फॉर्म्युलामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुणांवरुन मुल्यमापन केले जाईल.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ च्या धर्तीवर राज्य सरकार आणि राज्य मंडळाने समन्वय समितीच्या माध्यमातून हा फॉर्म्युला तयार केला आहे. यासोबतच जे विद्यार्थी निकालाने असमाधानी असतील त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा बदल झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुक्षिततेच्या दृष्टीने विचार करत बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी सर्व संबंधीत घटकांशी चर्चा करून मुल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केली.