जागतिक आरोग्य संघटनेचा कोरोनाच्या नव्या व्हेरियंट बद्दल इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
1 July : भारतात दुसऱ्या लाटेच्या कहरानंतर जगभरात भारतातील व्हायरसबाबत भीती व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा डेल्टा वेरियंट अतिक घातक असू शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. डेल्टा वेरियंटचे काही रुग्ण महाराष्ट्रात देखील आढळले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे. डेल्टा व्हायरसबाबत चिंता कायम असतानाच आता नवा वेरियंटने चिंता वाढवल्या आहेत.
कोरोनाचा या नव्या वेरियंटचं नाव ‘लॅम्ब्डा वेरियंट’ आहे. आरोग्य संघटनांनी या व्हायरसबाबत गंभीर इशारा दिला आहे.जागतिक आरोग्य संघटनेने देखील कोरोनाच्या लॅम्ब्डा वेरियंट ला ‘वेरियंट ऑफ इंटरेस्ट’ रुपात वर्गीकरण केलं आहे. १५ जूनला डब्ल्यूएचओने २९ देशांमध्ये ‘लॅम्ब्डा वेरियंट’ मिळाला आहे. या वेरियंटचा संसर्ग दक्षिण अमेरिकेतून सुरु झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आता दक्षिण ब्राझील ते ब्रिटेनपर्यंत तो पसरला आहे. न्यूज मेडिकल लाइफ साइंसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटलं आहे की, कोरोनाचं हे रूप वेगाने ब्रिटन मध्ये पसरत आहे. इंग्लंडमध्ये या व्हायरसबाबत चिंता व्यक्त केल्या जात आहेत.ब्रिटेनमध्ये लॅम्बडा वेरियंट चे प्रकरण ऑगस्ट २०२० मध्ये समोर आले होते. त्यानंतर आतापर्यंत २९ देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे. वैज्ञानिकांच्या मते, कोरोनाच्या या वेरियंटमध्ये स्पाइक प्रोटीनमध्ये अनेक म्यूटेशन दिसले आहेत. ज्यामुळे याची ट्रांसमिसिबिलिटी वाढल्याची पुष्टी होते.