राजकारणभारत

अजब! गजब! राजकारण आता ‘या’ नेत्याने केला पंतप्रधान पदावर दावा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 July : एक दिवस असा येत जेंव्हा मी भारताचा पंतप्रधान होईल हे उद्गार आहेत रासप या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे.राष्ट्रीय समाज पक्ष देशातील अनेक राज्यात पसरलेला पक्ष आहे.रासप चे अंतिम ध्येय दिल्ली असून कुणाचा पण पाठिंबा घेऊन एक दिवस भारताचा पंतप्रधान होईल असे रासप अध्यक्ष म्हणाले.ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष ४ जुलै रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनाच्या तयारीच्या निमित्तानं कोल्हापुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ‘देशाची सत्ता ताब्यात घेण्यासाठी, बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी मी रासपची स्थापना केली आहे. अनेक राज्यात या पक्षाचा विस्तार झाला आहे.

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत या पक्षाचे प्रतिनिधी आहेत. पक्षाची वाटचाल योग्य पद्धतीने सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा रस्ता डांबरीकरणाचा आहे, तर भाजपचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. आपला रस्ता मात्र फारच वेगळा आहे. रासपचे आज दोन आमदार आहेत. उद्या २५ होतील. काही खासदार होतील. कधी ना कधी रासपची ताकद वाढेल. या देशाचा पंतप्रधान म्हणून मला संधी मिळेल. मी नाही झालो तरी रासपचा माणूस पंतप्रधान होईल. त्यासाठी मला कुणाचाही आधार घ्यावा लागला तरी चालेल,’ असंही जानकर म्हणाले.1