भारत

पेट्रोल दर पुन्हा! गगनाला भिडणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 July : ओपेक या पेट्रोल उत्पादन करणाऱ्या देशाच्या संघटनेने या वर्षी जे महिने शिल्लक राहिले आहेत. त्यात इंधन पुरवठा कमी करण्याचे सूतोवाच केले.अमेरिकेत देखील इंधन पुरवठ्यात सलग सहाव्या आठवड्यात घाट झाल्यानंतर इंधनाचे भाव बुधवारी वधारले.ऑगस्टमधला ब्रेंट क्रूडचे करार काल संपुष्टात आला. त्यानुसार इंधनाचे दर एका बॅरलमागे ०.५ टक्क्यांनी वाढून ७५.१३ डॉलर्सवर थांबले. सप्टेंबरचे करारही ३४ सेंट्सनी वाढल्याने हा भाव आता प्रति बॅरल ७४.६२ डॉलर्सवर स्थिरावला आहे.

अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या तेलाचा भाव प्रति बॅरल ४९ सेंट्सनं किंवा ०.७ टक्क्यांनी वाढून ७३.४७ डॉलर्स इतका झाला आहे. हे दोन्हीही निर्देशांक २०१८ मधल्या सर्वाधिक दराच्या अगदी जवळ आहेत. गेल्या आठ महिन्यातल्या सात महिन्यांत इंधनाच्या दरांत सलग वाढ झालेली आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या दरामध्ये जून महिन्यात १० टक्क्यांनी वाढ झाली तर ब्रेंटच्या दरांमध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली.रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे समोर आलं आहे की ब्रेंटचा या वर्षातला सरासरी भाव ६७.४८ डॉलर्स प्रति बॅरल इतका राहील तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा सरासरी भाव ६४.५४ डॉलर्स राहील. हे दोन्हीही दर मे महिन्यातल्या सर्वेक्षणापेक्षा वाढलेले दिसतात.

टेक्सास इंटरमीडिएटला जिथून तेलाचा पुरवठा होतो त्या कुशिंगमध्ये मार्च २०२० पासूनचा सर्वात कमी साठा सध्या आहे. कुशिंगच्या तेल कारखान्यांमध्ये कमी असलेला साठा आणि ओपेक राष्ट्रांची उद्या होणारी बैठक याचा विचार करता इंधनाचे भाव उद्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण, पुरवठ्यापेक्षा मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, असा अंदाज ह्युस्टनमधल्या लिपो ऑइल असोसिएट्सचे अध्यक्ष अँड्र्यू लिपो यांनी वर्तवला आहे.ओपेक राष्ट्रांच्या या बैठकीत तेलपुरवठ्यातील कपात एप्रिल २०२२ नंतरही सुरू ठेवावी का यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.