हवामान विभागाचं मान्सून बाबत भाकीत!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
1 July : राज्यात मान्सूनने जून महिन्यात चांगलीच हजेरी लावली,महाराष्ट्रात विभागावर पहिले तर कुठे मध्यम,तर कुठे जास्त मान्सूनच्या सरी बरसल्या.अनेक ठिकाणी संमिश्र स्वरूपाचा पाऊस झाला अशातचभारतीय हवामान विभागानं शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती जाहीर केली आहे. हवामान विभागानं जुलै महिन्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस सामान्य राहिलं, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाचे महानिदेशक मृत्यूंजय महापात्रा यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमी पाऊस होईल, मात्र दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशात शेतकरी खरिप हंगामाच्या पेरण्या करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका अंदाजानुसार 20 कोटी शेतकरी खरिप हंगामात धान, सोयाबीन, कापूस, मका, मूग, भूईमूग, ऊस, उडीद आणि तूर या पिकांची लागवड करत आहेत. खरिप हंगामातील शेती प्रामुख्यानं मान्सूनच्या पावसावर अवंलंबून असते. मान्सून सामान्य राहिल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो. खरिपातील पिकांना पाणी द्यावं लागत नाही.भारतात मान्सूनचा पाऊस दोन दिवस उशिरा दाखल झाला. त्यानंतर मान्सूननं गती पकडली होती. पुढील 7 ते 10 दिवसात मान्सून देशातील विविध भागात पोहोचला. यानंतर मान्सूनचा जोर ओसरला. हवामान विभागाच्या माहितीनुसार 8 जुलैपासून बंगालच्या खाडीवरुन येणारं वारं सक्रिय होईल. त्यामुळे देशात मान्सून 8 जुलैनंतर सक्रिय होईल.