वेदनादायक!’डॉक्टर्स डे’च्या दिवशी डॉक्टर दांपत्याने जीवन संपवले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
1 july : आज नॅशनल डॉक्टर्स डे हा आंतरराष्ट्रीय दिवस असून आजच्या दिवशी अतिशय दुःखद अशी घटना समोर आली आहे.पुण्यातील ही घटना घाटीत झाली,डॉक्टर्स असलेल्या दाम्पत्याने स्वतः चे जीवन संपविले.वानवडी पोलीस ठाणे सदरील घटना निदर्शनास आल्यावर घटना स्थळी दाखल झाले. निखिल दत्तात्रय शेंडकर (वय २७ ) आणि पत्नी अंकिता निखिल शेंडकर (वय २६ ) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.पोलिसांनी माहिती अंतर्गत वानवडी येथील आझादनगर भागात हे दोघे राहत होते.
दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वाद होत असत. काल निखिल काम संपल्यावर घरी येत असताना दोघांचे फोनवर वाद झाले. हे वाद झाल्यानंतर अंकिताने रागात फोन ठेवला. त्यानंतर निखिल नेहमीप्रमाणे घरी आला. त्यावेळी फोनवर वाद झाल्यानंतर पत्नीनं गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.यामुळे त्याला प्रचंड धक्का बसला होता . या नैराश्यातून निखिलनेही आज सकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यांनतर वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.