महाराष्ट्र

‘या’ ठिकाणी उद्या लसीकरण बंद राहणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 Jun :- कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या बंद राहणार आहे. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने माहिती दिली जाईल. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईच नाही तर अनेक ठिकाण लसीच्या पुरेशा साठ्याअभावी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. कल्याण-डोंबिवलीत तर सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण 25 लसीकरण केंद्रे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून लसींचा साठा पुरेशा प्रमाणात प्राप्त होत नसल्याने आठवड्यातून सरासरी दोन दिवस ही केंद्र बंद असतात. गेल्या आठवडाभरापासून लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने मंगळवार, बुधवार पालिकेची 25 लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. आजही साठा प्राप्त न झाल्याने उद्या म्हणजेच गुरुवारी देखील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.