बीड

बापलेकीचे हातपाय बांधुन चोरट्यांनी चोरल्या 25 शेळ्या

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 Jun :- धारूर तालुक्यातील अरणवाडी येथे अज्ञात चोरट्याने अर्जुन डोंगरे व त्याची मुलगी कौशल्या अभिमान भालेराव या बापलेकीचे हातपाय बांधुन त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील लहान मोठ्या 25 शेळ्या चोरून नेल्याची घटना मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. धारूर पोलीसांनी घटनास्थळी जावून परिस्थितीची पाहणी केली.

जखमी बाप आणि लेकीला धारूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने धारूर पोलीसात एकच खळबळ उडाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.