News

बाधित तरुणावर डायलिसिस करण्याची कुटूंबियाची मागणी

किल्लेधारूर – येथील कोरोना बाधित तरुण हा आधीच किडनीच्या आजाराने ग्रासलेला आहे. त्यावर डायलिसिस करणे अत्यंत गरजेचे असून आरोग्य प्रशासनाने याची दखल घेत डायलिसिस उपचार करण्याची मागणी कुटूंबियांनी केली आहे.

शहरातील कोरोना बाधित तरुण गेल्या दोन वर्षांपासुन किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. त्याच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात नियमित उपचार डायलिसिस सुरु होते. डायलिसिस साठीच बीड येथे खाजगी रुग्णालयात गेले असता कोविड-१९ चाचणीत तो पॉझिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले. सध्या बाधित रुग्णाला डायलिसिस करणे अत्यंत गरजेचे असुन रुग्णास डायलिसिस नसल्याने त्रास होत असल्याचे कुटूंबियांनी सांगितले. याबाबतीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांना संपर्क करण्यात आला असून दोन तासात रुग्णावर जिल्हा रुग्णालयात डायलिसिस करण्यात येणार असल्याची माहिती दिली.