बीड

बीड- 29 वर्षीय विवाहितेवर नराधमाने केला बलात्कार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 Jun :- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका २९ वर्षीय विवाहितेवर गेवराई तालुक्यातील भाऊसाहेब लक्ष्मण आंगुडे या नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.नेकनूर येथील डीटीएड कॉलेजच्या समोर असलेल्या पत्र्याच्या खोलीत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तिला, मुलांना व तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान पीडित महिलेने केज पोलिस ठाण्यात २८ जून रोजी दिलेल्या तक्रारीवरून नराधम आरोपी भाऊसाहेब आंगुडे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक सीमा कोळी या करत आहेत.