बीड

आता किराणा समान शिक्षक घरपोहच करणार

आता किराणा समान शिक्षक घरपोहचत करणार

  बीड : गेल्या 60 दिवसांपासून सतत ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांना बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घरपोहोच किराणा सामान पोहोच करण्यासाठी ड्युटी लावली आहे. बीड शहरात व कंटेनमेंट झोन घोषित केलेल्या भागात 314 शिक्षकांची यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाबाबत शिक्षकांमधून तीव्र रोष निर्माण झाला आहे.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून शिक्षकांना विविध चेकपोस्ट, कंटेनमेंट झोन घोषित झालेला भाग, रेशन दुकान, पेट्रोल पंपावर ड्यूट्या लावलेल्या आहेत. देशावर आलेली आपत्ती म्हणून शिक्षक सेवा करीत देखील आहेतच पण आता याच कामाबरोबर शिक्षकांना बीड शहरात व कंटेनमेंट झोन घोषित केलेल्या भागात किराणा सामान घरपोहच करावे लागणार आहे.