खून करून मृतदेह फेकला मांजरसुंबा घाटात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
29 Jun :- लिंबागणेश येथील निलेश शहादेव ढास या २५ वर्षीय तरूणाचा रात्री अज्ञात व्यक्तीने डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केला आणि मृतदेह मांजरसुंबा घाटात फेकून देऊन अपघात झाला असल्याचे दृश्य निर्माण केले. या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक साबळे, एपीआय दिपक रोटे, नेकनूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पीएसआय किशोर काळे, विलास जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला.
सकाळी उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. खून का व कोणी केला? याचा तपास करण्यासाठी ,पोलीसांनी मयत निलेश याचे कॉल डिटेल्स मागवले असून मांजरसुंबा परिसरातील सीसीटीव्ह फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. मात्र दुपारी उशिरापर्यंत पोलीसांना या प्रकरणातील आरोपीचा सुगावा लागला नव्हता.