महाराष्ट्र

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 Jun :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दरम्यान या बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होत आहे याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री दाखल झाले आहेत.

शरद पवारांपूर्वी परिवहनमंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहचले होते. शिवसेना खासदार संजय राऊतांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तीन दिवसांमध्ये दोन वेळा भेट घेतली आहे.तीन दिवसांपूर्वी राऊतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यानंतर संजय राऊत सोमवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर तिथूनच संजय राऊत हे शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओकला गेले होते. संजय राऊत हे दोन दिवसात सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटत आहेत. या सर्व घडामोडी पाहता महाविकास आघाडीमध्ये नेमकी चर्चा काय सुरू आहे, काय खलबतं सुरू आहे हे जाणून घ्यायची सर्वांनाच उत्सुकता आहे.