देश विदेशमहाराष्ट्र

कोल्हापूरच्या कन्येने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 June : भारताकडून ओसीजेक येथे नेमबाजी विश्वचषक 2021 स्पर्धा खेळण्यासाठी गेलेल्या नेमबाज राही सरनोबतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकाची पटकावले आहे. 25 मीटर एअर पिस्तल प्रकारात राहीनं 39 गुणांसह अव्वल स्थान प्राप्त करत सुवर्णपदक जिंकले . तिने फ्रान्सच्या माथिल्डे लामोले (31) हिला मागे टाकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

राहीने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मिळवलेले हे सुवर्णपदक भारताला नेमबाजी विश्वचषकात पहिलेच सुवर्णपदक आहे. राहीसोबत खेळणाऱ्या भारताच्या मनु भाकेरला खास कामगिरी करता न आल्याने तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.राहीने स्पर्धेत सुरुवातापासून अप्रतिम कामगिरी करत 40 पैकी तब्बल 39 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले.

राही पाठोपाठ फ्रान्सच्या मॅथिलडे लामोलेला हिला 31 गुणांसह रौप्यपदक जिंकले . तर रशियाच्या विन्टालिना हिला 28 गुणांसह कांस्य पदक पटकावले .या विश्वचषकात भारताला १० मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सौरभ चौधरी आणि मनु भाकेर या भारतीय जोडीने रौप्यपदक मिळवले होते . मात्र अद्यापर्यंत भारताला सुवर्णपद पटकावता आले नव्हते.