पालकांना मोठा दिलासा! 50 टक्क्यांपेक्षा जास्त लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
29 Jun :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना असल्याचे वृत्त समोर आल्यापासून पालकवर्गाची धांदल उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशा परिस्थितीमध्ये दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. मुंबईतील 24 वॉर्डमध्ये मे आणि जून महिन्यात 6 ते 18 वयोगटांतील लहान मुलांचा सर्व्हे केला होता. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर सेरो सर्व्हेचा हा निकाल आशादायक मानला जात आहे.
या सर्व्हेसाठी एकूण दहा हजार मुलांचे नमुने घेण्यात आले होते, अशी माहिती आहे. महानगरपालिकचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी म्हणाले की, मुंबईत 18 वर्षाखालील मुलांची सेरो सर्वेची मोहीम हाती घेतली होती. 1 एप्रिल ते 15 जून दरम्यान पालिकेच्या 24 वार्डात लहान मुलांचे सॅम्पल कलेक्ट केले. त्यामध्ये असं समजलं की 50 टक्क्यांपेक्षा अधिक मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार झालेले आहेत . सर्व्हे केल्यानंतर अभ्यास केला असता त्यामध्ये असं समजलं की मुलांमध्ये अँटी बॉडीज तयार आहेत. प्रत्येक वार्डमधून 100 मुलांचे सॅम्पल घेतले यामध्ये कोणतेही निकष ठेवले नव्हते. अँटीबॉडीज तयार झाल्या ही आनंदाची बाब आहे, असं ते म्हणाले.
सुरवातीला एक सर्व्हे केला होता तेव्हा 21 टक्के होता पण आता 50 च्या वर गेला आहे. हे असं असलं तरी आम्ही कोरोनाशी लढाई लढणार आहोत. कोणतीही तडजोड आपण करणार नाही. लहान मुलांसाठी जी सेंटर आहेत ती अशीच राहतील तयारी पूर्ण असेल, असं ते म्हणाले. ककानी यांनी सांगितलं की, तज्ञ मंडळी जरी वेगळे निकष लावत असतील तरी आपली तयारी कायम असणार आहे. आपल्यातकडून कोणतीही तडजोड केली जाणार नाही.लहान मुलांच्या लसीकरणाबाबत ते म्हणाले की, केंद्राकडून जे सूचना येतील त्याचे पालन केले जाणार आहे.
18 वर्षांवरील लसीकरणाबाबत ते म्हणाले, जसजसा साठा आपल्याला मिळाला तर आपण जोमाने लसीकरण करतोय. कोल्ड स्टोरेज उपलब्ध आहेत. लस मिळत जाईल तस लसीकरण केले जाईल.कोरोनाचे वाढते विषाणू तपासण्यासाठी लॅब आपण उपलब्ध करत आहोत. दोन आठवड्यात ही लॅब पूर्ण काम करेल. कस्तुरबा रुग्णालयात ही लॅब कार्यरत असेल या लॅबच काम पूर्ण होईल, असं ते म्हणाले. डेल्टा प्लससंदर्भात बोलताना ते म्हणाले, डेल्टा प्लसचा 1 रुग्ण आढळला आहे. जे कोरोनाचे नियम आहेत ते नियम पाळावे मग आपण कोणत्याही आजारावर मात करू.