महाराष्ट्र

उच्चशिक्षण मंत्र्याची महत्वपूर्ण घोषणा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 June : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक पालकांना जीव गमवावा लागला होता.ज्यांचा कोरोनाने मृत्यू झाला अशा पालकांच्या पाल्यांना म्हणजेच विध्यार्थ्यांना उच्चशिक्षण मंत्र्याने मोठा दिलासा दिला आहे.जे अकृषी विद्यापीठात आहेत अशांना संपूर्ण फी माफी जाहीर करण्यात आली आहे .कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आई, वडिल गमावले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अकृषी विद्यापीठांची फी कमी करण्याचा तत्वत: निर्णय झाला आहे.

त्यामुळे उद्यापर्यंत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंसोबत शुल्काबाबत दुपारी चार वाजता बैठक झाली. सुमारे एक तास ही बैठक पार पडली. प्रत्येक विद्यापीठांचे फी स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत. त्यामुळे कोणत्या विद्यापीठांचे शुल्क किती कमी होणार यासंदर्भात संध्याकाळी कुलगुरु चर्चा करतील आणि त्यानंतर उद्यापर्यत यासंदर्भातला निर्णय येईल अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.

यात संलग्न विद्यापीठाला असलेली महाविद्यालये आणि असंलग्न विद्यापीठाला असलेल्या महाविद्यालयांची फी किती कमी होईल याचे माहिती येईल. ज्यात वेगवेगळ्या विद्यापीठात ग्रंथालय, जिमखाना याचे वेगवेगळे शुल्क असल्याने यासंदर्भातला निर्णय उद्यापर्यंत टळला आहे.अशाच प्रकारचा फी माफीचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला होता.सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे मोठे फी माफ करून केले आहे