भारत

ट्विटर वर सरकारची वक्रदृष्टी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 June : केंद्र सरकार व ट्विटर यांच्यात चांगलेच शीतयुद्ध पेटले आहे. सरकारने नवीन IT नियम लागू केले तरी ट्विटर त्याची पायमल्ली करतय असे बर्यासश्या प्रकरणावरून निदर्शनास येत आहे.सरकारने तंबी दिली तरी ही सोशीअल नेटवर्किंग साईट नियमांचे पालन करत नाही.केंद्र सरकारच्या नवीन आयटी कायद्यामुळे ट्विटर आण‍ि भारत सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. त्यामुळे ट्व‍िटरच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. टि्वटरचे भारतातील प्रभारी निवासी तक्रार अधिकारी यांनी राजीनामा दिला आहे. IT नियम 2021 नुसार अंतरिम तक्रार अधिकाऱ्याचे नाव झळकवणे अनिवार्य आहे. हा नियम 25 मेपासून लागू करण्यात आला आहे. टि्वटरवर आता भारतातील तक्रार अधिकाऱ्याच्या जागी कंपनीचे नाव, अमेरिकेचा पत्ता आणि ईमेल आयडी दर्शवला जात आहे.

सरकारने टि्वटरला अंतिम नोटीस धाडली होती. या नोटिसीच्या उत्तरात , आम्ही आयटी नियमांचे पालन करू इच्छितो. कंपनी मुख्य अनुपालन अधिकाऱ्याची माहिती देईल. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार टि्वटरने मध्यस्थ म्हणून मिळत असलेली सुरक्षितता गमावली आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या कंटेंटसाठी कंपनी जबाबदार असेल.केंद्र ने 25 मे रोजी जारी केलेल्या नवीन नियमांनुसार सर्व सोशल मीडिया कंपन्यांना आपले वापरकर्ते आण‍ि पीडितांच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक यंत्रणा तयारी करावी लागत होती. अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचे नाव, फोन नंबर आण‍ि संपूर्ण पत्ता आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे लागत होते. नियुक्त करण्यात आलेले अध‍िकारी भारतातच राहणारे असावे.