भारत

स्वपक्षीय खासदाराची भाजपवर टीका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 June : भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आपल्याच पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. चीननं देशात घुसखोरी केल्यानंतर आपल्याला त्यांना सडेतोड उत्तर देणं गरजेचं होतं. गलवान, कैलाश रेंजमध्ये आपण करुन दाखवलं. मात्र पुन्हा एकदा चर्चेकडे वळलो. हे चर्चेचं गुऱ्हाळ मला समजत नाही. आपली जमीन आहे, आपल्या छातीवर बसले आहेत. त्यांच्य़ाशी चर्चा काय करायची. आपल्याला त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. चीनसोबत युद्ध करणं गरजेचं आहे.

. चीन जगासमोर आपल्याला दाबत असल्याचं दाखवत आहे. त्यात त्यांना यश मिळताना दिसत आहे., अशा शब्दात सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला खडसावलं.नरेंद्र मोदी स्वत: सांगतात, ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनी कोणत्याही पदावर राहू नये. वयोमानामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि शांताकुमार यांना बाजूला सारलं आहे. आता २०२४ मध्ये भाजपाचा चेहरा कोण असेल?, याबाबत त्यांनी खुलासा केला पाहीजे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला पाहीजे. कार्यकर्त्यांना विचारलं नाही, तर वाजपेयींसारखी परिस्थिती होईल,असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं.

. त्याचबरोबर २०२४ मध्ये भाजपाचंच सरकार येईल, हे देखील सांगायला ते विसरले नाही. खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुब्रमण्यम स्वामी सरकारची कानउघाडणी करत आहेत. चीनची घुसखोरी, करोना, राम मंदिर या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्यांच्या या टीकेनंतर विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळाला आहे. तर २०२४ साली पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे.