राजकारण

यंदा पंढरपूर च्या वारीत दिंडयांना परवानगी नाही

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 June : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी वारीवर पण सावट दिसत आहे. यंदाच्या वारीत मनाच्या पालख्यांना मान्यता देण्यात आली आहे तसेच या पालख्यासोबत सहभागी होणाऱ्या दिंडयांना परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार १० मानाच्या पालख्या या बसेसमधून पंढरपूरला नेण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.वारीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी अन्य दिंड्यांच्या प्रमुख दोन प्रतिनिधींना सहभागी होण्यास परवानगी देण्याची मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली होती. आळंदीहून ४३०, देहूमधून ३३० आणि सासवड येथून ९८ दिंड्या सहभागी होत असतात.

मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राव यांनी ही मागणी अमान्य केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार पालखी प्रस्थान सोहळा आणि वारी होणार आहे. याबाबतचे आदेश राव यांनी काढले आहेत.राज्य सरकारच्या निर्णयानुसार, आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी ही परंपरेप्रमाणे पायी करण्याऐवजी मानाच्या दहा पालख्या या बसेसमधून पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदी आणि देहू या ठिकाणी प्रत्येकी १०० जणांना, तर अन्य आठ ठिकाणी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे. पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी वाखरी येथून दीड किलोमीटरपर्यंत पोलिस बंदोबस्तात पायी वारी जाणार आहे.वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या १० पालख्या या वाखरी येथे एकत्र येणार आहेत. त्या पालख्यांबरोबर असणाऱ्याच वारकऱ्यांना पायी वारीमध्ये सहभागी होण्यास परवानगी असणार आहे. त्या काळात वाखरी परिसरात कलम १४४ लागू असणार आहे.