महाराष्ट्र

राज्यात उद्यापासून कठोर निर्बंध

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 June : दुसऱ्या लाटेचा धोका टळतो ना टळतो ते तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. डेल्टा प्लस नावाच्या विषाणूमुळे हा धोका संभवतो.पुढच्या ४ ते ६ सहा आठवाड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.अत्यावश्यक दुकाने व सेवा रोज सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत खुली राहतील.

हे निर्बंध पुढील प्रमाणे असतील मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील .सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील.माॅर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंगला पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मुभा असेल.खासगी आणि शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू असतील.लग्नसोहळ्यांना ५० लाेकांची, तर अंत्यविधीला २० लोकांची मर्यादा असेल.ई-कॉमर्स दुपारी २ पर्यंत सुरू असेल.जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहणार आहे.

डेल्टा प्लस व तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे नियमांत केला बदलइतर दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंत खुली, शनिवार-रविवार मात्र बंदमुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश जारी केले. यानुसार सर्व प्रशासकीय क्षेत्रांत साप्ताहिक पॉझिटिव्हिटी निर्देशांक व ऑक्सिजन सुविधायुक्त खाटांची टक्केवारी कितीही असली तरी त्यांनी बंधनांचा स्तर, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांकडून स्पष्ट आदेशान्वये जोवर बंधने मागे घेतली जात नाहीत तोवर तिसऱ्या स्तराइतका ठेवावा.बाकीचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतील.