बीड

दिलासादायक! वाचा कधी चालू होणार लहान मुलांचे लसीकरण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 June : देशात लसीकरणाने वेग धरला आहे असून आतापर्यंत लोकसंख्येच्या जवळपास २० टक्के लोकांनी लस घेतली आहे देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु असून लवकरच १२ ते १८ वर्षातील मुलांसाठी लस लवकरच उपलब्ध होणार आहे. भारतीय औषध कंपनी झायडस कॅडिलाकडून ही लस तयार करण्यात आली आहे. केंद्राने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. झायडस कॅडिलाच्या लशीची चाचणी पूर्ण झाली असून मान्यता मिळाल्यानंतर लसीकरणास सुरुवात होईल.

सुरूवातीला लसीकरणाच्या धोरणात बदल करण्यात आल्यानंतर लसीकरण मोहिमेबद्दल सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांना उत्तर देताना सुप्रीम कोर्टाने वर्षअखेरपर्यंत देशातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याची योजना असल्याची माहिती दिली.१८ वर्षांपुढील नागरिकांची एकूण लोकसंख्या ९३ ते ९४ कोटी असून त्यासाठी एकूण लसींच्या १८६ कोटी डोसची गरज असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. सर्व वयोगटासाठी केंद्रावर पोहोचल्यानंतर लस देण्याची सुविधा निर्माण करण्यात आले असून यापुढे ऑनलाइन नोंदणी बंधनकारक नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने न्यायालयात सांगितलं आहे.