बीड

पंकजा मुंडे ची राज्य सरकारवर ओबीसी आरक्षणावरून टीकास्त्र

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 June : ओबीसी चे राजकीय आरक्षणावरून वातावरण चांगलेच तापले असून,त्यावरून आज भाजपने राजयाभरात चक्क जॅम आंदोलन केले.या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर टीकेची भडीमार केली . पुण्यामध्ये अशाच आंदोलनात बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली. ५० टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना ५० टक्क्यांखालचं आरक्षणही सरकारनं गमावलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला सुनावलं आहे.

राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले तसेच विविध घोषणा देण्यात आल्या.पंकजा मुंडे यांनी यावेळी इम्पेरिकल डेटा जमा करण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचं सांगितलं. “या सरकाने १५ महिने फक्त कोर्टाकडून तारखा घेतल्या. इम्पेरिकल डाटाच्या आधारावर आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारने डाटा तयार करण्यास सांगण्यात आलं. पण सरकारने कोणताही डाटा तयार केला नाही.

यांनी जाऊन कोर्टात स्वीकारलं की ओबीसीला जास्त आरक्षण दिलंय. कोर्टानं त्याच दिवशी आरक्षण रद्द केलं आणि ५० टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना ५० टक्क्यांच्या आतलं आरक्षणही संपुष्टात आलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर देकील टीका केली.ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही चक्काजाम जाहीर केला, तर सरकारी पक्ष देखील आंदोलनाची भाषा करायला लागले. मंत्री असताना आंदोलनाची भाषा करणं तुम्हाला शोभतं का मंत्र्यांनी निर्णय करायचे आहेत, आंदोलन करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो हे तुमच्या नाकर्तेपणामुळे झालं आहे, असं त्या म्हणाल्या.